कपाशीचे भाव स्थिरावले; खेडा खरेदी होत आहे कमी..!

नागपूर :

कापसाचा हंगाम आता मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यातही सुरू झालेला आहे. परिणामी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व खानदेश भागातील खेडा खरेदी कमी झालेली आहे. मात्र, तरीही राज्यात कापसाला ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असा भाव टिकून आहे.

एक खंडी कापसाच्या रुईला सध्या देशात ४० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. त्यातच सीसीआय यांच्याकडून कापूस खरेदी जोरात सुरू असल्याने खासगी व्यापाऱ्यांची मनमानी कमी होऊन दर बऱ्यापैकी स्थिर आहेत. त्याचाच फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*