‘त्यामुळे कांद्याबाबत चिंताच नाही..!’

दिल्ली :

कोणत्या प्रश्नावर काय आणि कसे उत्तर देऊ नये याचा नवा फंडा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आणलेला आहे. संरक्षण मंत्री असताना आणि अर्थमंत्री असतानाही त्यांचा विरोधकांच्या प्रश्नांवर व्यक्त होण्याचा हा जालीम फंडा कायम आहे. आता संसदेत बोलताना त्यांनी कांदा प्रश्नावर दिलेले अजब उत्तर ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे.

सीतारमन यांनी आपले कुटुंबीय कांदा, लसूणसारखे पदार्थ जास्त खात नसल्याचं अजब स्पष्टीकरण देऊन धमाल उडवून दिली आहे. “मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही,” असे सांगून अर्थमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशाला उत्तर दिले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*