कांदा बातमी । फ़क़्त चोरी नाही आता आंतरराष्ट्रीय तस्करीही सुरू..!

दिल्ली :

राजकीय क्षेत्राला झटका देणाऱ्या कांद्याने आता गुन्हेगारी क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. कारण, भाव वाढले की कांद्याची चोरी होणे ही नित्याची बाब होती. मात्र, आता याच मौल्यवान कांद्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करीही सुरू झाली आहे.

चोरी होत असलेल्या कांद्याच्या घटनांमुळे उत्पादक शेतकरी चिंतेत असतानाच आता भारत सरकारला कांद्याच्या तस्करीकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. नेपाल देशात भारतीय कांदा तस्करी करून नेण्याचा कट उघडकीस आलेला आहे. मात्र, यापूर्वीही अशीच तस्करी होऊन कांदा मोठ्या प्रमाणात देशाबाहेर गेल्याची भीती यानिमित्ताने व्यक्त होत आहे. तसेच पुढील काळात कांद्याची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान केंद्र सरकारपुढे उभे ठाकले आहे.

उत्तरप्रदेश राज्यात लखनौ येथील डायरेक्ट्रेट ऑफ रिवेन्यू इंटेलीजेंस यांच्या टीमने नेपाल देशात तस्करी होणारा कांद्याचा ट्रक पकडला आहे. ३६०० क्विंटल बटाटा विक्रीसाठी नेत असल्याचे भासवून कांद्याची तस्करी करण्याचा हा प्रकार व्यापार्यांनी केलेला आहे. महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवां येथे हा प्रकार उघडकीस आला. निनावी फोनद्वारे माहिती मिळाल्याने ही तस्करी उघडकीस आलेली आहे. वरती बटाट्याच्या काही गोण्या टाकून गाडीत खाली सगळं कांदा भरून नेण्याचा हा प्रयत्न उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे..!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*