कॉंग्रेसमुळे वाढलेत कांद्याचे भाव; भाजप नेत्यांचे ट्विट

पुणे :

देशभरात कांद्याचे भाव वाढल्याने दिल्लीसह अनेक ठिकाणी आता वेगवेगळे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने याच्याविरोधात आंदोलन करीत आहेत. राजकीय लाभ उठविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना आयताच कांदा हातात सापडला आहे. अशावेळी कॉंग्रेसच्या राज्य सरकारांमुळे कांद्याची दरवाढ झाल्याची टीका भाजप नेते राजू घुगे यांनी म्हटले आहे. तर, तेच रिट्विट प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केले आहे.

त्यांनी हिंदी भाषेत ट्विट करून म्हटले आहे की, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान याच तीन राज्यात कांदा पिकतो. या तिन्ही राज्यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार आहे. प्रशार्थक सूर आवळून वाघ यांनी कॉंग्रेस पक्षाला कांदा दरवाढीसाठी जबाबदार ठरविले आहे. ” भारत में 70% से ज्यादा प्याज महाराष्ट्र, मध्य प्रदेश और राजस्थान में पैदा होता है आप समझे प्याज के दाम क्यों बढ़ रहे है ??? क्यों कि काँग्रेस आई है फिर से ।” असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*