मका व सोयाबीनच्या जीएम क्रॉपला युरोपात हिरवी झेंडी..!

दिल्ली :

एकूण जगात जेनेटिकली माॅडिफाइड आॅर्गेनिझाम अर्थात जीएमओला विरोध करण्याचा स्वदेशी ट्रेंड आलेला आहे. भारतातही त्याचे लोन जोरात आहेत. अशावेळी युरोपमध्ये या पिकाच्या उत्पादित शेतमालास आणि त्याद्वारे उत्पादित प्रक्रियायुक्त पदार्थांना खाण्यासाठी खुले करण्यात आलेले आहे. जनुकीय संशोधित पिकाच्या उत्पादनांमुळे आरोग्याच्या व पर्यावरणीय समस्या निर्माण होण्याचा बाऊ दाखविला जात असतानाच असे पदार्थ खाण्यायोग्य असल्याचे विकसित देशातील संशोधन संस्था व शासकीय यंत्रणा सांगत आहेत.

युरोपियन युनियनच्या European Food Safety Authority (EFSA) अन्नसुरक्षा मानके संस्था यांनी मका पिकाच्या सहा आणि सोयाबीन पिकाच्या दोन वाणाचे शेतमाल व प्रक्रियायुक्त पदार्थ खाण्यायोग्य असल्याचे परिपत्रक प्रसिद्द्जीस दिलेले आहे. maize MZHG0JG, maize MON 89034 x 1507 x NK603 x DAS-40278-9, maize MON 89034 x 1507 x MON 88017 x 59122 x DAS-40278-9, maize Bt11 x MIR162 x MIR604 x 1507 x 5307 x GA21, the renewals of soybean MON 89788 and of soybean A2704-12, the renewal of cotton LLCotton25, and the renewal of oilseed rape T45 या व्हरायटीना आता युरोपात सगळीकडे खाण्यायोग्य मानले जाणार आहे. युरोपातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

माहितीचा स्त्रोत : https://geneticliteracyproject.org/

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*