डाळिंब | उत्पादनात भारतामध्ये महाराष्ट्र प्रथमस्थानी..!

डाळिंब या कोरडवाहू फळपिक लागवडीद्वारे महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण पट्ट्याच्या भागातील हजारो शेतकऱ्यांना बागायतदार म्हणून मिरवण्याची संधी मिळाली आहे. मात्र, आता वातावरणीय बदलाच्या आणीबाणीच्या परिस्थितीती इतर पिकांप्रमानेच या कोरडवाहू नगदी पिकाला मोठा फटका बसला आहे. देशात डाळिंब लागवड आणि उत्पादनात एकट्या महाराष्ट्राचा वाटा ६० टक्क्यापेक्षा जास्त इतका मोठा आहे. मात्र, उत्पादन खर्च वाढत असतानाच अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादक संकटात आहेत.

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग

डाळिंब म्हटले की, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागातील दुष्काळी आणि आता अगदी बागायती म्हणवून घेणाऱ्या भागातील पिक अशीच ओळख आहे. महाराष्ट्र राज्याची या पिकामधील मोनोपॉली संपण्याची काही चिन्हे नाहीत. मात्र, देशांतर्गत बाजारात इतर फळांमध्ये डाळिंब फळाला विशेष मनाचे स्थान नसतानाच अतिरिक्त रासायनिक फवारणीमुळे निर्यातीला खोडा बसून या पिकाच्या उत्पादकांना अनेकदा नुकसानीचा सौदा करावा लागत आहे. हेच चित्र बदलण्यासाठी सरकारी पातळीवरून निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या योजना आणि शेतकऱ्यांच्या स्तरावर दर्जेदार विषमुक्त फळांचे उत्पादन करण्याचे मोठे आव्हान आहे.

सध्या भगवा डाळिंब जातीच्या वाणाची सर्वाधिक लागवड झालेली आहे. या भगवा वाणाच्या फळांना वर्षभर सरासरी ४० रुपयांचा भाव मिळतो. मात्र, एकूण शेतीमधील गुंतवणूक, उत्पादनासाठी झालेला खर्च आणि विक्रीद्वारे हातात आलेली रक्कम याचा मेळ लक्षात घेता या फळांना किमान ५० रुपये किलो किंवा त्यापेक्षा जास्तीचा भाव घाऊक बाजारात मिळण्याची गरज आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना फायदा आणि बहुसंख्य शेतकऱ्यांना तोटा सहन करून डाळिंब शेती करावी लागत आहे. अशावेळी खर्च कमी करून उत्तम दर्जाचे फळ उत्पादित करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी सरकारी व शेतकरी या दोघांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. रासायनिक कृषी निविष्ठा उत्पादक व विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून शेताकार्यान्चो होणारी लुट रोखण्यासाठी कृषी विभागाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

भारतातील डाळिंब उत्पादक प्रमुख राज्ये व त्यांची उत्पादन टक्केवारी अशी : (आकडेवारी वर्ष २०१७-१८)

राज्याचे नावटक्केवारी
महाराष्ट्र६३
गुजरात १६
कर्नाटक
आंध्रप्रदेश
मध्यप्रदेश
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*