सेंद्रिय औषधे व खताची खरेदी करताना पुढील काळजी घ्या..

अहमदनगर:

जिल्‍हयात चांगला पाऊस झाल्‍याने रब्‍बी हंगामामध्‍ये कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी लागणारे निंबोळी पेंड व इतर सेंद्रिय खते शेतकरी मोठया प्रमाणावर खरेदी करतात. सध्‍या  बाजारामध्‍ये विविध उत्‍पादकांचे निंबोळी खत, निम ऑईल तसेच इतर सेंद्रिय खते उपलब्‍ध आहेत. ही खते खरेदी करताना शेतक-यांची फसवणूक होण्‍याची शक्‍यता असते. त्‍यासाठी शेतक-यांनी खते खरेदी करताना खालील प्रकारे काळजी  घ्‍यावी.

शेतक-यांनी निविष्‍ठा अधिकृत परवानाधारक‍ विक्रेत्‍याकडूनच खरेदी करावी.  विक्रेत्‍याकडून खरेदीचे पक्‍के बिल घेण्‍यात यावे. या बिलावर निविष्‍ठाचे नाव, उत्‍पादकाचे नाव, बॅच / लॉट नंबरची माहिती नमूद करुन घ्‍यावी. दारोदारी किंवा फिरतीने विक्री करणारे विक्रेत्‍याकडून कोणत्‍याही परिस्थितीत निविष्‍ठा खरेदी करु नये. निविष्‍ठा विषयी फसवणूक झाल्‍यास तात्‍काळ लेखी स्‍वरुपात पक्‍क्‍या बिलाचे प्रतीसह संबंधीत तालुका कृषी अधिकारी / कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्‍याकडे तक्रार नोंदवावी.

तसेच निविष्‍ठा उत्‍पादक, वितरक व विक्रेत्‍यांनी कमी प्रतिच्‍या निविष्‍ठांची विक्री करु नये असे प्रकार आढळून आल्‍यास संबंधीतावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले  आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*