आधारभूत किंमतीनुसार तूर खरेदी सुरु

अहमदनगर :

केंद्र शासनाच्‍या  आधारभूत किंमतीनुसार सन 2019-20 या वर्षासाठी जिल्‍हयात नाफेड करीता मार्केटींग फेडरेशनच्‍या सभासद संस्‍थामार्फत तूर खरेदी नोंदणी केंद्र सुरु करण्‍यात आलेले आहे.  शासनाने तूर खरेदीसाठी 5 हजार 800 रुपये प्रति क्विंटल दर व  दिनांक 1  जानेवारी 2020 ते 14 फेब्रुवारी 2020 पर्यत नाव नोंदणीचा कालावधी निश्चित करण्‍यात आलेला आहे.

जिल्‍हयामध्‍ये तूर खरेदी केंद्र – राहुरी तालुक्‍यासाठी  राहुरी तालुका खरेदी विक्री संघ लि, राहुरी, (मोबाईल नंबर 9665722815), शेवगाव तालुक्‍यासाठी जगदंबा महिला ग्राहक सह.संस्‍था, शेवगाव (मोबाईल नंबर 9604168168), जामखेड तालुक्‍यासाठी पुण्‍यश्‍लोक कृषी प्रक्रिया सह.संस्‍था, जामखेड (मोबाईल नंबर 8888425757), कर्जत तालुक्‍यासाठी कर्जत तालुका खरेदी विक्री संघ मिरजगाव (मोबाईल नंबर 7498964909), पाथर्डी तालुक्‍यासाठी जय भगवान स्‍वयंरोजगार सह.संस्‍था पाथर्डी (मोबाईल नंबर 9423164754), नगर तालुक्‍यासाठी कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती नगर (मोबाईल नंबर 8208851909) व पारनेर तालुक्‍यासाठी कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती पारनेर (मोबाइल नंबर 99222881458) या ठिकाणी  सुरु करण्‍यात आलेली आहेत.

शेतक-यांनी तूर खरेदीसाठी सातबारा उतारा, चालू बँक खाते पासबुक प्रत, आधारकार्ड या दस्‍तऐवजाची आवश्‍यकता असून नोंदणीत भरण्‍यात येणारी  सर्व माहिती बरोबर असल्‍यास नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस येईल. शेतक-यांनी शेतमाल हा स्‍वच्‍छ व वाळवून खरेदी केंद्रावर घेऊन यावा. माल  खरेदी झाल्‍यानंतर त्‍वरीत ऑनलाईन काटा पट्टी घेण्‍यात यावी. या योजनेमध्‍ये केवळ ऑनलाईन काटा पट्टी ग्राहय धरण्‍यात येईल. शेतमालाची रक्‍कम आपण दिलेल्‍या बॅंक खाती ऑनलाईन पध्‍दतीने जमा होणार आहे. त्‍यामुळे बॅक खात्‍याची माहिती बिनचूक देण्‍यात यावी. अन्‍यथा आपली रक्‍कम जमा होण्‍यास विलंब होईल किंवा चुकीच्‍या बँक खात्‍यामध्‍ये रक्‍कम वर्ग होऊ शकते.  जिल्‍हयातील सर्व शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्‍यावा  असे जिल्‍हा पणन अधिकारी अहमदनगर यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*