नवीन वर्षात कांद्यासह भाजीपाल्याचा वांदा..!

नवी मुंबई :

कांद्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळाल्यावर वर्षाच्या शेवटी एकाएकी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आला परिणामी कांद्याचा दर घसरायला सुरू झाला. कांद्यासह भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. कोबी, टोमॅटो आणि इतर भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे. सर्वाधिक एक हजार टन आवक बटाट्याची झाली. ही आवक वाढल्याने दर कमी होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला समोरे जावे लागत आहे.

सध्या बाजारात गुजरातमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. महाराष्ट्रातून पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातुन बाजारात भाजीपाला येत आहे. बाजार समिती समवेत छोटमोठ्या बाजारातही फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, भेंडी, दुधी भोपळा, गाजर, कारली, ढोबळी मिर्ची, दोडका आणि वाटाण्याचे दरही घसरले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*