पांढरा कांदा आहे औषधी, बाजारात मिळतेय चांगली पसंती..!

बाजारात सर्वत्र लाल कांदा दिसत असला तरी पांढरा कांदा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा कांदा औषधी असल्यामुळे त्याला चांगला भाव मिळत आहे.

या कांद्याची चव गोड असते. त्यामुळे त्याला ठराविक वर्गाकडून मागणी आहे. या कांद्याची आपल्याकडे जास्त प्रमाणात लागवड होत नसली तरी हा कांदा मागणीला पुरत आहे. हा कांदा रोजच्या जेवणात वापरला जात नसला तरी अधून मधून जेवताना हा औषधी कांदा वापरला जातो. महिला वर्ग हा कांदा एका वेगळ्या चवीचा मसाला बनवण्यासाठी वापरतात. सध्या नाशिक व गुजरात मधून हा कांदा आपल्याकडे विक्रीस येत आहे. या कांद्याला चांगला भाव सध्या मिळत आहे. आपल्याकडे नाशिक, अलिबाग, वसई या भागांत कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*