मुख्यमंत्र्यांनी घेतला जिगांव जलसिंचन प्रकल्पाचा आढावा

मुंबई :

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील जिगांव जलसिंचन प्रकल्पाच्या सद्यस्थिती व नियोजित कामांचा आढावा मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी घेतला.    

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी  योजनेअंतर्गत हा प्रकल्प समाविष्ट असून मार्च 17 पर्यंत अर्थसहाय्य प्राप्त आहे. राज्यपाल महोदयांच्या सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रमांतर्गत या प्रकल्पाचा समावेश आहे. पस्तीस टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण झालेला विदर्भातील हा महत्वाकांक्षी मोठा प्रकल्प आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांवजवळ पूर्णा नदीवर हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत, तसेच पुढील नियोजनाची माहिती, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव आय.एस. चहल यांनी दिली. या प्रकल्पासाठी बंदिस्त नलिका प्रणाली कामाच्या एपीसी निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी व निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव आय.एस चहल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*