भाजीपाल्याचे भाव कोसळले, बळीराजा अडचणीत

अहमदनगर :

कोरोनामुळे बचावात्मक पवित्र घेत आठवडे बाजार बंद ठेवले गेले. त्यानंतर गुरांचे बाजारही बंद झाले, तसेच परदेशातून कांद्याच्या मागणीत अचानक घट झाली आहे. कापूस, कांदा आणि इतर भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत आहे परंतू परराज्यातील व्यापाऱ्यांनी या मालाकडे पाठ फिरवली आहे.

बाजार समित्यामध्ये 60% पेक्षा अधिक व्यवहार ठप्प झाले असून तिथेही शुकशुकाट पसरला आहे. सध्या गव्हाची काढणी सुरू आहे. काही प्रमाणात नवीन गहू बाजारात आलेला आहे. परंतु मुंबई, वाशी, पुणे येथील व्यापारी खरेदीसाठी येत नसल्याने गहू अगदी कमी दराने विकला जात आहे. एका बाजूला भाजीपाला आणि इतर धान्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे मात्र मागणीचे प्रमाण अगदी किरकोळ असल्याने बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*