भाजीपाल्याची बोंबाबोंब; संत्रा उत्पादकांना दिलासा

अहमदनगर :

भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे पण मागणी मात्र अगदीच कमी आहे. त्यामुळे भाजीपाला, कापूस, कांदा, गहू आदी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होत असले तरी ज्यांनी संत्री घेतली आहे त्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात संत्रा बाजारात विकण्यासाठी आला असला तरी दुप्पट भाव संत्राला मिळत असल्याने संत्रा उत्पादक खुश आहेत. राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जवळपास 1800 कॅरेटची आवक झाली.

एकूणच शेतमालाला मिळणारे सध्याचे भाव पाहता संत्रा उत्पादकांची चांदी झालेली आहे. गेल्या आठवड्यात संत्राला 350 ते 400 रुपये प्रति कॅरेट भाव होता. मात्र कालच्या बाजारात थेट 800 रुपये प्रति कॅरेट भाव संत्राला मिळत होता. येत्या महिन्याभरात संत्र्याला चांगली मागणी राहू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*