कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हळदीच्या विक्रीत वाढ

मुंबई :

जंतुनाशक म्हणून हळदीची ओळख सर्वज्ञात आहे. सध्या कोरोना या जंतूंचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढली आहे. सगळ्या वस्तू, पदार्थ यांची मागणी घटत चालली असली तरी हळदीची मागणी वाढत आहे.

सांगली जिल्ह्यातील हळद ही सर्वोत्तम मानली जाते त्यामुळे तिथल्या उत्तम दर्जाच्या हळदीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच वाशीतील मसाला मार्केटमध्ये 10 ते 15 टक्‍क्‍यांनी हळद खरेदी वाढली आहे. रोज साधारणपणे 200 टन हळदीची विक्री होत असल्याची माहिती हळदी व्यापाऱ्याने दिली आहे.

आपल्या भारतीय स्वयंपाक पद्धतीमध्ये जे वापरले जाणारे मसाले आहेत, ते एक प्रकारे औषधांचे काम करतात. त्यापैकी हळद एक आहे. हळद गुणकारी असून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करते. हळदीचे रोज सेवन केल्यास खोकला, त्वचारोग, सर्दीसारख्या संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवते. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*