अन्नदात्यासाठी अनेकांनी केला अन्नत्याग…

पुणे :

19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा काल ३४वा स्मृती दिन होता. त्यानिमित्ताने गेल्या कित्येक वर्षांपासून अन्नत्याग केला जातो. अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणजे एक दिवसाचा उपवास करण्यात आला.

यंदा करोनाचे निमित्त करून सरकारने सामुदायिक उपोषणाला परवानगी दिली नाही. अनेक ठिकाणी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली, तरीही लोकांनी वैयक्तिक उपवास करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यंदाच्या उपवासात महिलांचा सहभाग लक्षणीय होता असे अमर हबीब यांनी सांगितले.

अमर हबीब पुण्यात किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते अमर हबीब यांनी काल सकाळी फुलेवाड्यात जाऊन फुले दाम्पत्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले व नंतर दिवसभर उपवास केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*