एकीकडे ‘कोरोना’ तर दुसरीकडे महाराष्ट्रावर ‘आस्मानी’ संकट

मुंबई :

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. राज्य व केंद्र सरकार जास्तीत जास्त उपाययोजना व खबरदारी घेत आहेत. तरीही कोरोना हा संसर्गजन्य असल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार घरातून बाहेर न पाडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आज आणि उद्या म्हणजेच 25 मार्चला महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला असून अजून पाऊस येण्याचे वातावरण आहे.

महाराष्ट्राच्या काही भागांवर पुढील 48 तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज स्कायमेटकडूनही वर्तवण्यात आला आहे. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*