महाराष्ट्र तापतोय, भिजतोय आणि..!

मुंबई :

सगळीकडे उन्हाच्या झळा बसत आहेत. फॅनही गरम हवा फेकतोय. घराच्या बाहेरही जाता येईना अशी अवघडलेली अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात सध्या वातावरण मिश्र आहे. पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उन्हाचे चटके तर काही ठिकाणी चिंब ओला करणारा पाऊस खरं तर उन्हाळ्यात पाऊस म्हणजे बेमोसमी आणि नुकसानकारक आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपुर्ण राज्यांत कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. जळगाव ३९, पुणे ३७.६, सांगली ३८, सोलापूर ३९.६, बीड ३९.२, अकोला ४०.३ अमरावती ३९.४ या शहरात कमाल तापमान सर्वाधिक नोंदविण्यात आले आहे. मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमान ३६ तर किमान तापमान २२ अंश नोंदविण्यात येत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*