होय, तुमचं आमचं वीजबिल होणार कमी..!

मुंबई :

कोरोनाची धास्ती सगळयांनाच आहे. उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे नोकऱ्या नाहीत. काम नाही, बाजारात खेळते भांडवल नाही. मग लोकांकडे पैसे येणार कुठून? हेच लक्षात घेत महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने महाराष्ट्रात वीज देणाऱ्या विविध कंपन्यांना विजेचे दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. घरगुती, औद्योगिक आणि शेतीला देण्यात येणाऱ्या वीज पंपांच्या विजेच्या दरात दहा ते १५ टक्के कपात करण्यात येणार आहे.

पुढील ३ ते ५ वर्षांसाठी ही कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मोठ्या उद्योजकांसह तुमचं- आमचं म्हणजेच सर्वसामान्य जनतेला वीजबिल कमी येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये बेस्ट, टाटा आणि अदानी यांच्यामार्फत वीजपुरवठा केला जातो. या सर्वांना राज्य वीज नियामक मंडळाने वीजदरांमध्ये कपात करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य वीज नियामक मंडळाने बेस्टला घरगुती ग्राहकांचे वीजदर दिड ते दोन टक्के कमी करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत. इंडस्ट्रिअल म्हणजेच औद्योगिक वापरासाठी देण्यात येणाऱ्या विजेच्या दरात ७ टक्के कपात तर दुकानांसाठी म्हणजेच कमर्शिअल वीज दरांमध्ये ८ टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*