यशोगाथा | या गड्याचा नादच खुळा; वीस गुंठ्यांत कमावले तीन लाख रुपये

पुणे :

बारामती म्हणल्यावर मंग शक्य आहे. काढू शकतो बॉ 3 लाखाचं उत्पन्न… पण अस नाहीहे राजेहो, ज्यो डोकं लावतो आणि मेहनत बी करतो त्यालाच यश हाये भौ… बारामतीच्या काटेवाडी गावात राहणाऱ्या या गड्यानी फक्त मिरचीच्या जीवावर 3 लाख उत्पन्न काढलं ते बी फकस्त वीस गुंठ्यांत.

आता विसच गुंठ्यांत का? कारण ज्याला मोजकी शेती असते त्याला गुंठ्यांतच शेती करावा लागती हे माहिती नाही का? ह्या गड्याचं नाव बापूराव भिसे, ह्यो गडी तसा लई नादिके बर का… कायम वेगवेगळ्या पिकातून चांगल्या प्रकारे पैसे कमवण्याची आयडिया बापूला माहिती आहे. त्यामुळे यावर्षी पण तेजापुरी 94 या जातीची मिरची लावली आणि पैसा केला. 20 गुंठ्यासाठी चार हजार रोपे त्यांनी 1 रुपया 20 पैसे दराने खरेदी केली आणि ती रानात लावली. अडीच महिन्यानंतर या मिरचीची तोडणी सुरू झाली. अजून पण चालुहे. सलग तीन महिने ही मिरची तोडली जाणार आणि तीन महिने पैसाच पैसा… साधारण दिवसाकाठी 60 ते 70 किलो मिरची निघती एका किलोस 50 ते 60 रुपये भाव मिळतो.

थोडक्‍या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे पीक कसे घ्यावे, याबाबत नेहमीच मी प्रयत्न करत असतो. या अगोदर केळीचे पिक त्याचबरोबर कोबी व इतरही पिके कायम घेत आहे. कष्टाची तयारी सर्व कुटुंबाची असल्याने नेहमी शेतामध्ये कोणतेही पीक उत्तम रित्या आणले जात आहे. त्यामुळेच प्रत्येक पिकातून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवून आर्थिक फायदाही होत आहे.
-बापूराव भिसे, शेतकरी

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*