घरी जाण्यासाठी केली ही आयडिया; ट्रकमध्ये भरला कांदा आणि गाठलं गाव..!

कोरोनाच्या भीतीने सगळे गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हायवेने नसले तरी आडवाटेने अनेक रस्ते असतात, लोक त्याचा उपयोग करत आहेत. पण आता आडवाटेनेसुद्धा पोलीस उभा असल्यामुळे एका महाभागाने आयडिया शोधली आहे. खरे तर आयडिया केली आणि खड्ड्यात गेली अशी त्याची परिस्थिती आहे.

या महाभागाचे नाव प्रेममूर्ती पांडे आहे. त्याला गावी जायचे होते. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात तो मुंबईतच थांबला. त्यावेळी त्याचे हाल झाले असावे म्हणून दुसर्या टप्प्यात कसल्याही परिस्थितीत त्याने घरी जायचे ठरविले. मग काय आयडिया सुचली कि भाजीपाला आणि फळे हे आपण गावाकडे नेऊ शकतो. रस्त्यात कुठलीही आडकाठी येणार नाही. याच गोष्टीचा फायदा घेत त्याने पिंपळगावमधील उत्तम दर्जाच्या कांदा बाजाराचा अभ्यास केला.

25 हजार 520 किलो चांगल्या दर्जाचा कांदा केला दोन लाख 32 हजार रुपयांमध्ये खरेदी केला. नंतर 77 हजार 500 रुपये भाड्याने एक ट्रक घेतला आणि 20 एप्रिलला अलाहाबाद कडे हा ट्रक रवाना झाला. त्याच्या गावी जाईपर्यंत म्हणजे जवळपास १२०० किलोमीटर प्रवास बिनदिक्कत पार पडला. अंधेरी पूर्वमधील आझाद नगरमध्ये मी जिथे राहत होतो तो भाग करोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक होता. तर, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बस, रेल्वे व विमानसेवा थांबण्यात आलेली होती. या परिस्थिती मला दिसून आले की, सरकारने एक मार्ग खुला ठेवला आहे. तो म्हणजे अत्यावश्यक सेवा म्हणून फळ व भाज्या आदींच्या वाहतुकीला शिथिलता देण्यात आलेली आहे. दुसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्यात आल्याने हा मार्ग पत्कारला असल्याची माहिती त्याने पीटीआयशी बोलताना दिली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*