शेतकऱ्यांना मिळाला GoogleDocsचा आधार; पिक कर्जासाठी अर्ज करणे झाले सोपे

नांदेड :

परिस्थितीचे भान असलेले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने समाजाला पथदर्शक कार्यपद्धती शिकवणारे अधिकारी या भारतात अजूनही आहेत. त्याचाच प्रत्यय या करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे. पिक कर्जासाठी बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी गुगल डॉक्स या सोफ्टवेअरची मदत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला आहे.

याबाबत नांदेड येथील जिल्हा माहिती कार्यालयाने ट्विटरवर पोस्ट शेअर करून आवाहन केले आहे. तसेच फेसबुक आणि इतर माध्यमातून याची माहिती नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्यात म्हटले आहे की, ‘#शेतकऱ्यांनी कर्ज मागणीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी @drvipinitankarआवाहन #LockDown व गर्दीमुळे होणारा विषाणूसंसर्ग टाळण्यासाठी सन 2020-21 #खरीपहंगाम पीककर्जसाठी शेतकऱ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7He0g/viewform?usp=sf_link… या लिंकवर ऑनलाईन नोंदणी दि.17मे ते 27मे, 2020 दरम्यान करवी’

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*