अम्फान चक्रीवादळ आज आदळणार; वीस लाख लोकांचे स्थलांतर

दिल्ली :

या शेकडो वर्षांमधील सर्वात भयंकर असणारे अम्फान हे चक्रीवादळ ओडिसा तसेच पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावर आज आदळणार आहे. यादरम्यान या दोन्ही किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीच्या खबरदारीचा उपाय म्हणून तब्बल वीस लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागातील परिस्थितीचा व येणार्‍या संकटाचा चाहुलीचा आढावा घेतला आहे.

यावेळी तेथील राज्य सरकारच्या केंद्र सरकार सातत्याने संपर्कात असून लष्कराला सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचवेळी मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या २४ तुकड्या तेथे तैनात करण्यात आल्या आहेत.

हे वादळ महाभयंकर असून ते मोठ्या वेगाने येत आहे. तसेच किनारपट्टीजवळ येताच त्याचा वेग वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे म्हणून ओडिशामधील तब्बल ११ लाख पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविले असून त्या सर्व नागरिकांची तेथे राहण्याची जेवणाची सोय केली आहे. कारण ओडिशामध्येच सर्वात जास्त वादळाचा धोका आहे.

एनडीआरएफ, लष्कर, प्रशासकीय यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अशा विविध यंत्रणा त्या ठिकाणी राहून काम करत आहेत. तसेच या वादळापासून नुकसान कसे कमी करता येईल, असाही प्रयत्न ते करत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*