गंगाखेड तहसीलदारांनी दाखवली शेतकऱ्यांप्रती कर्तव्यभावना; पहा कोणता खास निर्णय घेतलाय

परभणी :

शेतकऱ्यांच्या नेमक्या दुखण्यावर औषध न शोधता वातानुकूलित कार्यालयात बसून गाडा हाकणाऱ्या अधिकाऱ्यांचा भरणा प्रशासनात जास्त आहे. अशावेळी काहीजणांचे शेतकरी हिताचे काम मग कौतुकाचा भाग बनते. कारण अपवाद हीच बातमी. आताही गंगाखेड तहसीलदारांनी कोविड १९ च्या आपत्तीचे भान ठेऊन शेतकरी हिताचा निर्णय जरी करून बँकांना मार्गदर्शन केले आहे.

तहसीलदार यांनी अशा पद्धतीचे परिपत्रक काढल्याने शेतकऱ्यांचा मोठा मनस्ताप आणि तलाठी कार्यालयाचे हेलपाटे वाचल्याची भावना ‘कृषीरंग’चे वाचक आणि धारासूर गावातील शेतकरी प्रल्हाद निर्मळ यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, तहसीलदारांनी आदेशात स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की बँकांनी जुन्या कर्जदार शेतकऱ्यांना पिक कर्जाचे नवे-जुने करण्यासाठी फेरफार नकलेची मागणी करू नये. शेतकऱ्यांना बँकांनी यंदा पुन्हा नव्याने फेरफार मागणी केली होती. मात्र, असे फेरफार नक्कल काढण्यासाठी होणारी गर्दी आणि या करोनाच्या संकटात सुरक्षित अंतर ठेऊन व्यवहार करण्याचा नियम पायदळी तुडवला जाण्याचीच भीती होती. तहसीलदारांनी असा आदेश काढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तहसीलदारांनी ईमहाभूमी या पोर्टलवर असलेल्या ऑनलाईन माहितीचा आधार घेऊन जुन्या कर्जदार शेतकऱ्यांना यंदा नव्याने पिक कर्ज देण्याचा स्पष्ट आदेश दिला आहे. त्यावरच संबंधित शेतकऱ्यांच्या नावाची व जमिनीची खात्री करण्याच्या सूचना स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, एचडीएफसी बँक, युको बँक व आयसीआयसीआय बँक यांच्या गंगाखेड शाखांना तहसीलदारांनी दिल्या आहेत.

ता.क. : तुमच्या भागात पाऊस झाला किंवा पावसाने काहीही नुकसान झालेले असल्यास आम्हाला ९४२२२१५६५८ या क्रमांकावर किंवा krushirang@gmail.com या इमेलवर फोटो, व्हिडीओ व माहिती पाठवा. आम्ही त्यास तुमच्या नावासह प्रसिद्धी देऊ. *{इतरही बातम्या (जसे की शेतीकथा, यशकथा, शेतीचे प्रश्न, ग्रामीण समस्या, गावचे प्रश्न, राजकीय, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम यांची माहिती) आपण पाठवू शकता. फ़क़्त माहिती पुराव्यासह (फोटो, व्हिडीओ, माहितीपुस्तक) असावी..}

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*