अम्फान चक्रीवादळात ओडिशामध्ये ३, पश्चिम बंगालमध्ये १२ जणांचा मृत्यू

कोलकाता :

काल अम्फान हे चक्रीवादळ ओडिसा तसेच पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावर आदळले असून यात ओडिसा मधील ३ तर पश्चिम बंगालमधील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. माचिस काडीपेटीमधील एखादी काडी जितक्या सहजपणे मोडते, तितक्या सहजपणे तेथील विजेचे खांब कोसळत होते. कोलकाता व दक्षिण बंगालच्या बहुतेक भागांमध्ये गेलेल्या या चक्रीवादळाने साडेसात तासांच्या राक्षसी क्रोधाने प्रचंड मोठे नुकसान केले आहे.

बांगलादेश मध्ये १० लाख पेक्षा अधिक लोकांनी आपला वीजपुरवठा गमावला आहे. तर थोड्याफार फरकाने ओडिसामध्येही तीच परिस्थिती आहे. यात जीवितहानी, लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, शेतीचे नुकसान, व्यवसायांचे नुकसान झालेले आहे.

यावेळी गेल्या काही दिवसांपासून सुरक्षेचा भाग म्हणून ओडिशामधील तब्बल ११ लाख पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. त्या सर्व नागरिकांची तेथे राहण्याची जेवणाची सोय केली होती. तसेच पश्चिम बंगाल मधील लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.
यावेळी तेथील राज्य सरकारच्या केंद्र सरकार सातत्याने संपर्कात असून लष्कराला सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्याचवेळी मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या २४ तुकड्या तेथे तैनात करण्यात आल्या होत्या.

एनडीआरएफ, लष्कर, प्रशासकीय यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अशा विविध यंत्रणा त्या ठिकाणी राहून काम करत होत्या. तसेच या वादळापासून नुकसान कसे कमी करता येईल, असाही प्रयत्न ते करत होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*