Blog | म्हणून कृषी साक्षरता महत्वाची; टोमॅटोच्या निमित्ताने वाचा हेही

‘टोमॅटोमध्ये करोनापेक्षा भयानक विषाणू’ अशी बातमी येऊन धडकली आणि महाराष्ट्रातील टोमॅटोच्या पट्ट्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला. म्हणजे बातमीने नाही गोळा आला. पण बातमी आल्याने टोमॅटो बदनाम झाल्याने याचे भाव मातीमोल झाले आणि उत्पादक शेतकरीही मग मातीमोल झाला. कृषी साक्षरता नसल्याने शेतकरी या आधुनिक युगातही फसवला जात आहे. असेच चित्र राहिल्यास भविष्यात फसविला जाईल. हेच टाळण्यासाठी गरज आहे कृषी साक्षरतेची..!

लेखक : डॉ. प्रफुल गाडगेव्यवस्थापकीय संचालकबायोमी टेक्नोलॉजीजअहमदनगर.

मो. ८३७८८७८८७०; वेबसाईट : www.inventbiome.com

रोगाच्या कारणांव्यतिरिक्त यातील ऑब्झर्वेशन्स अतिशय महत्त्वाची आहेत. अमिनो ऍसिड बेस्ड बायोस्टिमुलंट्स (टॉनिक) ज्यामध्ये NATCA आणि जिब्रेलिक एसिड चा अतिरिक्त वापर करण्यात येतो, अशा टॉनिक्स चे एप्लीकेशन फळधारणा आणि त्यानंतर फळ मोठे होण्याच्या स्टेजवर झाल्यास फळांमध्ये स्पॉन्जिनेस आणि टिशू सॉफ्टनिंग वाढण्याची शक्यता असते. अप्रमाणित टॉनिक मधून नायट्रोजन आणि प्लांट ग्रोथ रेगुलटर्स अतिरिक्त वापरामुळे झाडाचे मेटाबोलिजम अतिशय वाढलेले झालेले असते, अशा परिस्थितीत मायक्रोन्यूट्रिएंट आणि इतर अन्नद्रव्यांचे अपटेक वाढते, सदर गोष्टी योग्य वेळी योग्य त्या प्रमाणात उपलब्ध झाल्या नाहीत तर झाडाला ताण येतो आणि ते रोगाला बळी पडते.

यामुळे पीजिआर सारख्या निविष्ठांचा योग्य त्या वेळी आणि नियंत्रित प्रमाणात वापर होणे गरजेचे आहे. प्रत्येक क्रॉप ची वेगवेगळ्या ग्रोथ रेगुलेटर ची गरज वेगवेगळ्या स्टेजेसला वेगवेगळी असते. एकच बायोस्टिमुलंट्स योग्य ते रिझल्ट देऊ शकत नाही. यासाठी क्रॉप स्पेसिफिक आवश्यकता असते. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यासंबंधी साक्षरता असणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*