खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत CMO म्हणत आहे की..!

मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून राज्य सरकारच्या धोरणांची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली आहे. तसेच यातील मुद्द्यांची माहिती देणारे थ्रेड मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, परवा खरिप हंगामाच्या तयारीची बैठक मंत्रिमंडळाने घेतली. त्यामध्ये पीक कर्जाचा विचार आला, विम्याची योजना आली, शेतकऱ्यांना बांधावर बी बियाणे कसे उपलब्ध करून देता येईल हा नवीन प्रयोग आपण करत आहोत. आपण शेतीच्या कामांना कुठेही अटकाव केला नाही आहे. कापूस खरेदीचा विषय अनेक जणांनी मांडला. आजपर्यंत आपण ७५-८०% कापूस खरेदी केलेली आहे. अजूनही चालूच आहे, बंद नाही केली आहे. तसचं इतर अन्नधान्याच काय करणार त्याही बाबतीत पूर्ण विचार करत आहोत, हे करत असताना आरोग्याचा विचार करत आहोत कारण तो महत्त्वाचा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*