कापूस खरेदी १५ जूनपर्यंत

मुंबई :

करोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर गेले कित्येक दिवस मार्केटमध्ये अनेक गोष्टींची विक्री करण्यात अडचण येत होती. तशीच कापसाचीही अडचण झाली होती. आता त्या सर्व अडचणी दूर करत कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. सरकारच्या हा निर्णय कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा तसेच दिलासा देणारा ठरला आहे. यावेळी ‘कापूस खरेदी ही १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार’ असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.  

आज सहकारमंत्री पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे कापूस खरेदीच्या विषयावर मंत्रालयातून जिल्हाधिकारी, डीडीआर यांच्याशी संवाद साधला तसेच या परिस्थितीचा आढावा घेतला. मग तातडीने कापूस खरेदी सुरु करण्याचे आदेश त्यांनी दिले.

कापूस खरेदीला गती द्यावी त्यासाठी गाड्यांची मर्यादा वाढवावी, शेतकरी ऑनलाईन नोंदणीच्या याद्या अद्ययावत कराव्यात, कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची कापूस खरेदी त्या-त्या दिवशीच पूर्ण करण्यात यावी, असे पाटील यांनी सांगितले.

करोनापासून सुरक्षा व्हावी म्हणून सोशल डिस्टन्सिंगच्या पालन करण्यासह ईतर काही सूचनाही त्यांनी दिल्या. दिवसेंदिवस उष्णता वाढते आहे त्यामुळे वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच कापूस खरेदी केंद्रावरील तयार गाठींच्या संकलनासाठी गोदामे कमी पडणार नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीला गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*