टोळधाडीच्या पाहणीसाठी कृषी विभागाला गृहमंत्र्यांचे आदेश

नागपूर : प्रेसनोट

नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोळधाडीने शेतीचे नुकसान होत आहे. त्यापासून बचावासाठी कृषी विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे, अशा सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.

काल, शनिवारी सायंकाळच्या सुमारास या टोळधाडीने काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपूर, गणेशपूर, शेकापूर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही माहिती मिळताच गृहमंत्र्यांनी रात्री साडेनऊ वाजता टोळधाड झालेल्या भागात जाऊन पाहणी केली. तसेच त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फवारणी तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जेणेकरून टोळधाडी पासून शेतकऱ्यांचे पीक, फळबागा, भाजीपाला वाचू शकेल वा कमीत कमी नुकसान होईल.

शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सुद्धा टोळधाडपासून बचाव करण्यासाठी बँड, फटाके यांचे मोठे आवाज करावेत, मोठ्या प्रमाणात धूर करावा, त्यामुळेही टोळधाडीपासून आपण बचाव करू शकतो, असे श्री. देशमुख म्हणाले.

नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत कृषी विभाग, महसूल विभाग, याबरोबरच स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

ता.क. : तुमच्या भागात पाऊस झाला, पावसाने किंवा इतर कीड-रोग व सरकारी, खासगी कंपन्या किंवा शासनाच्या दुर्लक्षामुळे काही समस्या निर्माण झालेल्या असल्यास आम्हाला कळवा. शेतकरी किंवा गावाचे काहीही नुकसान झालेले असल्यास आम्हाला ९४२२२१५६५८ या क्रमांकावर किंवा krushirang@gmail.com या इमेलवर फोटो, व्हिडीओ व माहिती पाठवा. आम्ही त्यास तुमच्या नावासह प्रसिद्धी देऊ. *{इतरही बातम्या (जसे की शेतीकथा, यशकथा, शेतीचे प्रश्न, ग्रामीण समस्या, गावचे प्रश्न, राजकीय, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम यांची माहिती) आपण पाठवू शकता. फ़क़्त माहिती पुराव्यासह (फोटो, व्हिडीओ, माहितीपुस्तक) असावी..}

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*