करोनाकाळात असे करा फळबागांचे व्यवस्थापन; वाचा सर्व फळांविषयी माहिती

लेखक : डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत फळांची हाताळणी विषयी मार्गदर्शन :

1. द्राक्ष :

·   द्राक्ष घडांची काढणी सकाळी किंवा सायंकाळी करावी.

·   काढणी केल्यानंतर घड जास्तवेळ शेतात / बागेत ठेवू नयेत.

·   घड वायूविजन असलेल्या सीएफबी पेटयांमध्ये भरुन पेटया बंद कराव्यात.

·   पेटया थंड तापमाणास ठेवून पूर्व शीतकरण करावे व लगेचच 0 ते 2 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात [कोल्डस्टोरेज] दोन महिन्यापर्यंत ठेवता येतात.

·   द्राक्षापासून उत्तम प्रतीचा बेदाणा तयार करता येतो.

·   थॉम्पसन सिडलेस, तास-ए-गणेश, सोनाक, माणिक चमण इ. जाती बेदाण्यासाठी उत्तम आहेत.

2. आंबा :

·   पाड लागल्यावर  झेल्याच्या सहाय्याने इजा न करता फळाची काढणी देठासहीत सकाळी किंवा सायंकाळी करावी.

·   फळे काढल्यानंतर बागेत जास्त वेळ न ठेवता पॅकिंग हाऊसमध्ये आणावित.

·   थंड पाण्यात ठेवून फळांचे पूर्वशितकरण करावे व फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवावीत.

·   द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे  वायूविजन असलेल्या सीएफबी पेटयामध्ये किंवा व्रेटमध्ये ठेवून, 10-12 अंश सेल्सीयस तापमानास व 85-90 टक्के आद्रतेत शीतगृहात एका महिन्यापर्यत साठविता येतात.

·   कच्च्या आंब्यापासून लोणचे, आमचूर व पन्हे तयार करता येते.

·   पिकलेल्या आंब्यापासून आंबापोळी व गर [पल्प] काढून वर्षभर साठवून ठेवता येतो.

3. चिक्कु :

·   काढणीस तयार झालेली फळे  झेल्याच्या सहाय्याने इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढावीत.

·   फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत.

·   फळे थंड झाल्यावर व्रेटमध्ये किंवा 0-2 टक्के वायूविजन असलेल्या 150 गेजच्या पॉलिथीनच्या पिशविमध्ये भरावीत.

·   पिशव्या बंद करुन 18-20 अंश सेल्सीयस तापमानास ठेवल्यास 15 दिवसापर्यंत उत्तमरित्या साठविता येतात.

·   पिकण्यास सुरुवात झालेल्या चिक्कु पासून कॅन्डी व गोड चटणी करता येते व पिकलेल्या चिक्कुपासून पावडर तयार करता येते.

4. केळी :

·   केळाला गोलाई येवून लागल्यावर, इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढावीत.

·   घड सावलीत आणल्यानंतर इजा न करता फण्या वेगळया कराव्यात.

·   फण्या थंड झाल्यावर 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.

·   द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर व्रेटमध्ये ठेवून, 14-15 अंश सेल्सीयस तापमानास व 85 टक्के आद्रतेत शीतगृहात तीन आठवडयापयर्र्ंत साठविता येतात.

·   केळीपासून वेफर्स, सुकेळी व पावडर  तयार करता येते.

5. कागदी लिंंबू :

·   फळे पोपटी रंगाची असताना इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढावीत.

·   काढलेली फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत.

·   फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.

·   द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे एक किलो क्षमतेच्या 0-2 टक्के वायूविजन असलेल्या 150 गेजच्या पॉलिथीनच्या पिशविमध्ये भरावीत किंवा व्रेटमध्ये भरावीत.

·   या पिशव्या 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात 40-45 दिवस ठेवता येतात.

·   कागदी लिंबापासून लोणचे, गोड चटणी, कॉर्डियल सिरप इ. पदार्थ तयार करता येतात.

6. मोसंबी :                

·   फळांना पिवळसर रंग दिसू लागल्यावर इजा न करता, देठ ठेवून सकाळी किंवा सायंकाळी काढावीत.

·   फळे पिरगाळून काढू नयेत.

·   फळे सावलित आणल्यानंतर हवेशीर व मोकळया जागेत पसरुन ठेवावीत.

·   कागदी लिंबाप्रमाणेच फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.

·   द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे व्रेटमध्ये भरावीत.

·   व्रेट 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात एक महिन्यापर्यंत ठेवता येतात.

·   मोसंबी फोडी काढून फ्रोजन करता येतात तसेच मार्मालेड, रस, सिरप व कार्बोनेटेड शीत पेय तयार करता येतात.

ता.क. : तुमच्या भागात पाऊस झाला, पावसाने किंवा इतर कीड-रोग व सरकारी, खासगी कंपन्या किंवा शासनाच्या दुर्लक्षामुळे काही समस्या निर्माण झालेल्या असल्यास आम्हाला कळवा. शेतकरी किंवा गावाचे काहीही नुकसान झालेले असल्यास आम्हाला ९४२२२१५६५८ या क्रमांकावर किंवा krushirang@gmail.com या इमेलवर फोटो, व्हिडीओ व माहिती पाठवा. आम्ही त्यास तुमच्या नावासह प्रसिद्धी देऊ. *{इतरही बातम्या (जसे की शेतीकथा, यशकथा, शेतीचे प्रश्न, ग्रामीण समस्या, गावचे प्रश्न, राजकीय, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम यांची माहिती) आपण पाठवू शकता. फ़क़्त माहिती पुराव्यासह (फोटो, व्हिडीओ, माहितीपुस्तक) असावी..}

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*