करोनाकाळात अशी करा शेतमाल साठवणूक; वाचा हे महत्वाचे २० मुद्दे

लेखक : डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेत पिकाचे काढणी पश्चात नियोजन

1.   धान्य पिके शेतातून काढल्यानंतर साफ व स्वच्छ करुन धान्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के पर्यंंत कमी होईपर्यंत सूर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.

2.   बीज उत्पादनासाठी धान्याचा वापर करावयाचा असेल तर अशा धान्य पिकांची काढणी वेेगळी करुन साफ व स्वच्छ करुन धान्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के पर्यंंत कमी होईपर्यंत सूर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.

3.   तृणधान्य पिकापासून वेगवेगळे पदार्थ जसे पीठ, रवा, नाचणी सत्व, कुरडया, पापड, चकली, बिस्कीटे इत्यादी तयार करुन बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करुन पुरवठा करावा.

4.   कडधान्य पिकापासून डाळी, पीठ इत्यादी सारखे उपपदार्थ इत्यादी तयार करुन बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करुन पुरवठा करावा.

5.   तेल बियांपासून तेल घाणीचा वापर करुन बाजारपेठेच्या मागणीनुसार तेल काढून वेष्टण करुन पुरवठा करावा.

6.   कांदा काढणी साठी आला असल्यास काढणी करुन शेतात 3 ते 4 दिवस सुकवावा नंतर पात कापून 2 ते 3 आठवडे सावलीत सुकवून प्रतवारी करुन कांदा चाळीमध्ये हवेशीर साठवावा.

7.   लसून काढणी झाल्यानंतर व्यवस्थित सुकवून जुडया बांधून हवेशीर निवा-याला बांधून ठेवाव्यात.

8.   करोनाच्या परिस्थितीमुळे फळे व भाजीपालांना बाजार पेठेच्या मागणी नुसार कमीत कमी हाताळणी करुन, वेष्टण करुन पुरवठा करण्यात यावा.

9.   फळांची काढणी योग्य परीपक्वतेला करुन योग्य त्या तापमानाला व आर्द्रतेला व्यवस्थित साठवावीत.

10.  काही फळांचे बाजार पेठेच्या आवश्यकते नुसार लगदा, रस, सिरप, स्क्वॅश इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ हवाबंद डब्यामध्ये किंवा बाटल्यांमध्ये साठवून पुरवठा करावा.

11.  काही फळांपासून लोणची, कॅण्डी, वाळविलेले तुकडे किंवा फळांची भुकटी करुन व्यवस्थित साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.

12.  आंबा पिकापासून आमचूर, लोणचे, मुरंब्बा, आंबा गर, आंबा पोळी इत्यादी प्रक्रिया युक्त पदार्थ बनवून साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.

13.  द्राक्षांपासून बेदाणा तयार करुन शीत कक्षामध्ये साठवावा.

14.  बटाटा व केळी सारख्या पिकांपासून चीप्स/वेफर्स तयार करुन वाळवून साठवावीत.

15.  काही फळभायांचे तुकडे करुन वाळवावीत, भुकटी करावी व साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.

16.  भाजीपाला तसेच मेथी, कडीपत्ता, पालक, कोथंबीर इत्यादी वाळवून हवाबंद साठवावीत.

17.  लाल मिरची व्यवस्थित सुकवून साठवावीत.

18.  आवळा, शतावरी, गवती चहा, अश्वगंधा, हिरडा,बेहडा इत्यादी वाळवून त्यांची पावडर करुन साठवावी.

19.  हळद काढणीला आली असल्यास शिजवून, वाळवून, पॉलीश करुन साठवून ठेवावीत.

20.  करोनाच्या परिस्थितीमुळे शहरामध्ये फळे व भाजीपाल्यांचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे, त्या परिस्थितीमध्ये शेतक-यांनी एकत्र येवून सोशल माध्यमांचा जसे व्हॉटस्अ‍ॅप, फेसबूक इत्यादींचा वापर करुन लोकांच्या आवश्यकतेनुसार विविध फळे व भाजीपाल्यांच्या टोपल्या बनवून लोकांपर्यंत पोहचावीत.

ता.क. : तुमच्या भागात पाऊस झाला, पावसाने किंवा इतर कीड-रोग व सरकारी, खासगी कंपन्या किंवा शासनाच्या दुर्लक्षामुळे काही समस्या निर्माण झालेल्या असल्यास आम्हाला कळवा. शेतकरी किंवा गावाचे काहीही नुकसान झालेले असल्यास आम्हाला ९४२२२१५६५८ या क्रमांकावर किंवा krushirang@gmail.com या इमेलवर फोटो, व्हिडीओ व माहिती पाठवा. आम्ही त्यास तुमच्या नावासह प्रसिद्धी देऊ. *{इतरही बातम्या (जसे की शेतीकथा, यशकथा, शेतीचे प्रश्न, ग्रामीण समस्या, गावचे प्रश्न, राजकीय, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम यांची माहिती) आपण पाठवू शकता. फ़क़्त माहिती पुराव्यासह (फोटो, व्हिडीओ, माहितीपुस्तक) असावी..}

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*