वाळवंटात करणार भातशेती; करोनाच्या निमित्ताने UAEचा निर्णय

करोना विषाणूने मानवजातीच्या अनेक देशांना आणि संस्कृतींना मोठा झटका दिला आहे. राहणीमान, जीवनमान आणि जगण्याच्या एकूण पद्धतीत बदल करणाऱ्या या विषाणूने आता काही देशांना अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याची सद्बुद्धी दिली आहे. त्यापैकीच एक देश म्हणजे संयुक्त अरब अमीरात (यूएई).

या देशाने आपल्या भागातील वाळवंटात भातशेती फुलविण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. आतापर्यंत अनेक देशांनी आपल्याकडे न पिकणाऱ्या पिकांचेही नंदनवन फुलवण्यात यश मिळवले आहे. आता अरबस्तानात भातशेती यशस्वी करण्याचा निर्णय संयुक्त अरब अमीरात (यूएई) यांनी घेतला आहे. त्याला निमित्त ठरले आहे कानोना विषाणूच्या संक्रमणामुळे बंद झालेली आयात-निर्यात.

दक्षिण कोरिया देशाच्या ग्रामीण विकास विभागाशी संयुक्त करार करून यंदाच या देशाने शारजाह या मोठ्या शहराच्या नजीक भातशेतीचा प्रयोग केला. त्यात त्यांना काहीअंशी यश आलेले आहे. एका हेक्टरमध्ये त्यांना १७ क्विंटल इतके उप्तादन मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. असेमी नावाच्या भाताचे वाण त्यांनी पेरले होते.

आपल्याला लागणाऱ्या एकूण खाद्यान्नाच्या पदार्थांपैकी किमान ९० टक्के पदार्थ हा देश आयात करतो. मात्र, कोविड १९ च्या साथीमुळे आयात ठप्प झाल्याने या देशात अनेकांचे खाण्याचे आल झाले. त्याचवेळी त्यांनी खूप उष्ण वातावरण आणि वाळूमध्ये खारवट जमिनीत भात पिकवून दाखवला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*