मका उत्पादकांना मदत करण्याची मागणी; हमीभावापेक्षा १००० रुपयांनी झाली होती खरेदी..!

चंडीगड :

शेतकरी महाराष्ट्रातील असोत, पंजाबचे नाहीतर अवघ्या जगातील. सर्व शेतकऱ्यांच्या पाचवीलाच फसवणूक व लुबाडणूक पुजलेली असते. मागच्या हंगामातही पंजाबमधील मका उत्पादक शेतकऱ्यांना असाच मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना प्रतिक्विंटल १००० रुपयांचा मोठा फटका सहन करावा लागला आहे.

याप्रकरणी शिरोमणि अकाली दल (शिअद) पार्टीने कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना मागणीचे निवेदन दिले आहे. सिकंदर सिंह मलूका यांनी त्यात म्हटले आहे की, १८५० रुपये इतके न्यूनतम समर्थन मूल्य (एमएसपी) असतानाही शेतकऱ्यांना आपली मका फ़क़्त ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल रुपयांना विकावी लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना वरील रक्कम मदत म्हणून देतानाच पुढील काळात राज्य सरकार किंवा मार्कफेड यांच्यामार्फत मक्याची सरसकट खरेदी करण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा.

यावर आता मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*