‘या’ योजनेद्वारे सरकार खरेदी करणार जनावरांचे शेण; पहा कशासाठी आणली ‘ही’ महत्वपूर्ण योजना

रायपूर :

पशुपालकांना आपल्या पशुधनाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे कार्य मोठ्या कष्टाने करावे लागते. तसेच अशी जनावरे चरण्यासाठी सोडल्याने सामाजिक व पर्यावरणीय समस्याही निर्माण होतात. या दोन्हींकडे लक्ष देत छत्तिसगढ सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना आणली आहे. त्यानुसार आता सरकारी यंत्रणा जनावरांचे शेण खरेदी करणार आहे.

गोधन न्याय योजना असे या योजनेचे नाव आहे. सध्या या राज्यात कॉंग्रेस पक्षाची सत्ता आहे. तेथील मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या योजनेची माहिती ट्विटरवर दिली आहे. भारतातील हे असे पहिलेच राज्य आहे जे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाच्या शेणाचे पैसे देणार आहे. २१ जुलै २०२० पासून या राज्यात ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी याची माहिती पत्रकार परिषेदेत देतानाच कृषिमंत्री रवींद्र चौबे यांच्या अध्यक्षतेखाली यासाठीची खास समिती कार्यान्वित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या राज्यातील सुमारे २२०० गावांमध्ये यासाठीचे गौठान तयार झालेले आहेत. तसेच पुढील कालावधीत आणखी २८०० गावांमध्ये शेण खरेदीसाठीची कार्यवाही करणारे असे केंद्र कार्यान्वित केले जाणार आहेत.

जनावरे खुल्या पद्धतीने चारल्याने जैवविविधता धोक्यात येऊ लागली आहे. तसेच बऱ्याचदा या कारणाने किरकोळ किंवा मोठी भांडणे होत असतात. या सगळ्यांना पायबंद घालण्यासाठीच्या उद्देशाने या सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे.

https://www.gaonconnection.com/ यांनी याबाबत स्पेशल फिचर न्यूज प्रसिद्ध केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*