मग कसे येणार शेतीला ‘अच्छे दिन’; ‘होल इंडिया’त फ़क़्त १८ प्रकल्प कार्यान्वित..!

सव्वा कोटी लोक्संख्याच्या भारताला लागणारे सर्व प्रकारचे खाद्यान्न आणि अन्नपदार्थ देशात उत्पादित करण्यासाठीची कसरत अजूनही भारतला करावी लागत आहे. अशावेळी शेतीच्या काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया या घटकाकडे भारत सरकार किंवा शेतकऱ्यांनी अजूनही विशेष लक्ष दिलेले नाही. परिणामी प्रतिवर्षी शेतमालाची किमान १ लाख कोटी रुपयांची नासाडी होत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी प्रक्रिया उद्योग उभारणी व साठवण, वाहतूक आणि वितरणाची सक्षम व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मात्र, आतापर्यंत मोठा गाजावाजा झालेल्या मेगा फूड प्रकल्पाच्या योजनेला विशेष गती आलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांना कधी अन कसे ‘अच्छे दिन’ येणार याचे कोडे आणखी गुंतागुंतीचे बनले आहे.

भारत सरकारच्या Ministry of Food Processing Industries यांच्यातर्फे देशभरात शेतमाल प्रक्रिया व वितरणाची साखळी मजबूत करण्यासाठीच्या घोषणा वेळोवेळी होत असतात. तसेच राज्य सरकारकडूनही काही योजना जाहीर केल्या जातात. त्यांचा बातम्यांमध्ये मोठा गवगवा होतो. आता उद्याच भारत जगातील अन्नपदार्थ उत्पादकांमध्ये आत्मनिर्भर होण्याचाच फील येतो. मात्र, प्रत्यक्षात असे काहीही होत नाही. महाराष्ट्र सरकारच्याही योजनांची अशीच गत आहे. सध्या भारतात फ़क़्त १८ मेगा फूड पार्क कार्यान्वित झाल्याची आकडेवारी अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेली आहे. त्यातले नेमके कोणते प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्याचीही शंका येण्याजोगी परिस्थिती आहे.

कोट्यवधी रुपये अनुदानाचे हे मेगा फूड पार्क प्रकल्प आहेत. मात्र, असे प्रकल्प जिथे सुरू झालेले आहेत. तिथे कोणत्या कंपन्या कार्यान्वित आहेत आणि त्यांनी किती क्षमतेने उत्पादन सुरू केलेले आहे. याबाबतची शंका येते. कारण, पैठण असोत की सातारा येथील मेगा फूड पार्क असोत. त्या ठिकाणी अजूनही पूर्ण क्षमतेने काम सुरू झाल्याचे जाहीर झालेले नाही. तसेच महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात फ़क़्त २ फूड पार्क उभारून काय होणार आहे, हाही प्रश्न आहेच की. त्यापेक्षा तालुकानिहाय छोटे-छोटे फूड पार्क प्रकल्प सुरू करण्याची योजना राबवण्याची खरी गरज आहे. कारण, शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक निर्धारित वेळेत करण्यासाठी असे प्रकल्प जवळ असणे आवश्यक आहे. तसेच त्याला ठोस अश सरकारी मदत देण्याचीही आवश्यकता आहे. मात्र, या दोन्हीमध्ये केंद्र व राज्य सरकार कमी पडले आहे.

भारतात शेतमाल प्रक्रियेचा टक्का ३ पेक्षा काही वाढलेला नाही. त्याचवेळी लाखो लोकांना कसदार व जीवनसत्वयुक्त आहार मिळण्याची वणवा आहे. तसेच शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठीची लॉटरी लागण्याची वाट पहावी लागत आहे. एकूणच या सर्व नकारात्मक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तालुकानिहाय एक यानुसार फूड पार्क उभारण्याचे नियोजन करावे लागणार आहे. याद्वारे शेतीमधील गुंतवणूक तर वाढेलच, परंतु, रोजगारही निर्माण होतील. यासाठी केंद्र सरकारला तर योजना आणावयाच लागतील. परंतु, राज्य सरकारच्या कृषी विभाग आणि उद्योग मंत्रालयाला एकदिलाने काम करण्याचे सूत्र आखावे लागणार आहे. त्यासाठीचा सुदिन जेंव्हा येईल तेंव्हाच शेतीला येतील ‘अच्छे दिन’..!

देशातील कार्यान्वित झालेल्या मेगा फूड पार्कची यादी पुढीलप्रमाणे (माहितीचा सोर्स : https://mofpi.nic.in/Schemes/mega-food-parks) :

following 18 Mega Food Parks are operational:

1. Srini Mega Food Park, Chittoor, Andhra Pradesh.
2. Godavari Mega Aqua Park, West Godavari, Andhra Pradesh.
3. North East Mega Food Park, Nalbari, Assam.
4. Gujarat Agro Mega Food Park, Surat, Gujarat.
5. Cremica mega Food park, Una, Himachal Pradesh.
6. Integrated Mega Food Park, Tumkur, Karnataka.
7. Indus Mega Food Park, Khargoan, Madhya Pradesh.
8. Avantee Mega Food Park, Dewas, Madhya Pradesh.
9. Paithan Mega Food Park, Aurangabad, Maharashtra.
10. Satara Mega Food Park, Satara, Maharashtra.
11. MITS Mega Food Park, Rayagada, Odisha.
12. International Mega Food Park, Fazilka, Punjab.
13. Greentech Mega Food park, Ajmer, Rajasthan.
14. Smart Agro Mega Food Park, Nizamabad, Telangana.
15. Tripura Mega Food Park, West Tripura, Tripura.
16. Patanjali Food and Herbal Park, Haridwar, Uttarakhand.
17. Himalayan Mega Food Park, Udham Singh Nagar, Uttarakhand.
18. Jangipur Bengal Mega Food Park, Murshidabad, West Bengal.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*