आखाड पाळ्या जोरदार; शेतकऱ्यांमध्ये उत्साह, खरीपासाठी उपकारक

अहमदनगर :

खरिपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असतानाचा आता पुन्हा एकदा नगर जिल्ह्यासह राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुग आणि बाजरी यासह कांदा, सोयाबीन व कपाशी आदि पिकांनाही आखाड पाळ्या उपकारक आहेत. मात्र, जर हाच पाऊस जास्त दिवस राहिला तर मात्र, शेतात तन (गवत) माजण्याची शक्यता आहे.

आषाढ महिन्यात जशी आषाढी एकादशी व पंढरीची वारी प्रतिवर्षी येते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आखाड पाळ्याही याच काळात येतात. आताही हा पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*