इग्जॉटिक फ्रुटच्या उत्पादनावर फोकस; फलोत्पादन विभागाकडून कार्यवाही सुरू

दिल्ली :

देशात इग्जॉटिक फ्रुटच्या मागणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. मात्र, त्या तुलनेत याचे उत्पादन होत नसल्याने बाहेरून आयत करावी लागत आहे. भारतीय इग्जॉटिक फ्रुटच्या जाती विशेष क्वालिटीचे उत्पादन देत नसल्याने आता केंद्र सरकारच्या फलोत्पादन विभागाने बियाण्यांची व रोपांची आयत करून अशी शेती करण्याचे धोरण आखले आहे.

इकॉनॉमिक टाईम्स वृत्तपत्राने याबाबतीत बातमी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सफरचंद, बदाम, अक्रोड, द्राक्ष आणि खजूर यांची मागणी देशात मोठी आहे. मात्र, भारतातील पारंपारिक जाती दर्जेदार फळांचे उत्पादन देण्यास कमी आहेत. त्यामुळे भारताला याची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. त्यात परदेशाला मोठा फायदा होतो. मात्र, भारतीयांना ही उत्पादने महाग पडतात.

त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांनाच असे उत्पादन घेण्यासाठी मदत करण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू झालेली आहे. असे दर्जेदार इग्जॉटिक फ्रुट बियाणे व रोपे आणण्याची जबाबदारी राष्ट्रीय बीज निगम यांच्यावर देण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-कश्मीर या राज्यांनी याची मागणी केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*