राज्यात सुमारे 76 टक्के पेरणी पूर्ण : कृषीमंत्री

मुंबई : प्रेसनोट

राज्यातील पेरणी व पावसाची स्थिती याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी संजीवनी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात माहिती दिली.

कृषीमंत्री भुसे म्हणाले, पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीवर आधारीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील 23 हजार 506 गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.  शेतीत नाविन्यपूर्ण  उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार केली असून त्यात 3606 शेतकऱ्यांची यादी प्रकाशीत करण्यात आली आहे. शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी कौशल्या आधारित प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत 141.99 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 107.48 लाख हेक्टर क्षेत्रावर (75.70 टक्के) पेरणी पूर्ण झाल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. 

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथील शेतकरी आणि नाशिक येथील सुनंदा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकरी मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कृषी राज्यमंत्री डॉ. कदम यांनी आभार मानले. सचिव एकनाथ डवले यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त सुहास दिवसे यांनी महाडिबीटी पोर्टल विषयी माहिती दिली. यावेळी राज्यभरातील कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*