धक्कादायक | पुणे मार्केटची गर्दी पहाल तर थक्कच व्हाल; मग करोना कसा हरणार..!

पुणे :

येथील गुलटेकडी मार्केट यार्डमधील एक खास गर्दीचा व्हिडिओ पत्रकार समीर राऊत यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी लॉकडाऊन करून काहीही होणार नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया लिहिली आहे.

त्यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, पुण्यात गर्दी नियंत्रित करून पुढचे दहा दिवस प्रशासन करोना नियंत्रणात आणणार आहे म्हणे.. पण आज सकाळी मार्केटयार्डात लॉकडाऊन मुळे खरेदीसाठी झालेली ही गर्दी बघता, आता लॉकडाऊनचे समर्थन करणारे राजकीय नेते आणि एसी मध्ये बसून गप्पा झोडणाऱ्या अधिकाऱ्याकडे काही उत्तर आहे का … या गर्दीने किती करोनाचे रुग्ण वाढतील..( व्हिडीओ सौजन्य : फॉरवर्ड व्हिडिओ आहे)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*