मोदींनी चर्चा केली ‘त्या’ CEO शी; पहा काय केलंय ट्विट

दिल्ली :

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई हे भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत. ते सध्या या बलाढ्य कंपनीची धुरा वाहत आहेत. याच सुंदर यांच्याशी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली.

त्यावर त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यात मोदीजी म्हणतात की, आज सुंदर पिचई यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये टेक्नोलॉजी आणि इतरही महत्वाच्या विषयावर सविस्तर बोललो. भारतीय शेतकरी, व्यावसायिक आणि तरुणाई यांच्यासमोरील संधी व आव्हाने यावरही चर्चा केली. हा वार्तालाप खूप चांगला झाला.

कोविड १९ च्या या आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीवरही आम्ही चर्चा केली. भविष्यावरही यात मंथन केल्याचे मोदींनी म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*