Blog| महिलांना सैन्यदलात समाविष्ट करून घेणारे पवार साहेब

राजकीय असो की सामाजिक जीवन असो. त्यामध्ये सगळ्यांना कोणी ना कोणी गुरू असतोच. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे गुरू म्हणजे आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. पवार साहेबांच्या याच कामावर आधारित खास लेखमाला मंत्री आव्हाड यांच्या फेसबुक पेजवरून सुरू झालेली आहे. आम्ही ती वाचकांसाठी जशीच्या तशी प्रसिद्ध करीत आहोत. @टीम कृषीरंग

साहेब_माझाविठ्ठल
भाग – 12

महिलांना सैन्यदलात समाविष्ट करून घेणारे पवार साहेब.

एकीकडे आयोध्या प्रश्न पेटलेला होता,आसाममध्ये उल्फा चळवळीने चांगलाच पेट घेतला होता,तर दुसरीकडे शेजारच्या देशांच्या कुरबुरीमध्ये देखील भरपूर वाढ झाली होती.अश्या बिकट परिस्थितीत पवार साहेबांनी 26 जून 1991 रोजी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून कारभार स्वीकारला.

साहेब पाऊने दोन वर्षच फक्त संरक्षणमंत्री होते.पुढे त्यांना महाराष्ट्रात पेटलेल्या जातीय दंगलीमुळे पुन्हा वापस येऊन मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं होत.पण या मिळालेल्या पाऊने दोन वर्षात,साहेबांनी आपल्या जबरदस्त क्षमतेची प्रचिती देशाला दिली.

संरक्षणमंत्री झाल्याबरोबर साहेबांनी सैन्यदलाच्या आधुनिकीकरनावर भर दिला. त्याकाळी भारताचा संरक्षणावरचा खर्च हा 30% पेक्षा कमी होता.
भारतीय उपखंडातील अस्थिर स्थिती लक्षात घेऊन पवार साहेबांनी त्यात वाढ करायचा निर्णय घेतला.

सोबतच सैन्यासाठी लागणारे शस्त्र आणि दारुगोळा तयार करण्याचे कारखाने पूर्णवेळ चालवण्याचा धोरणात्मक निर्णय देखील त्यांनी घेतला.त्यामुळे देशाला आवश्यक ती साधनसामुग्री निर्माण झाली.

सेवानिवृत्त सैनिकांना त्याकाळी अपूर वेतन होत.साहेबांनी “समान पद,समान निवृत्त वेतन” हे सूत्र स्वीकारून सैनिकांना पुरेसे निवृत्त वेतन देत त्यांच्यात असणारी नाराजी दूर केली.

त्याकाळी उल्फा या अतिरेकी संघटनेच्या कारवाया आसाममध्ये वाढल्या होत्या.त्यांना पायबंद घालणे आवश्यक होते.या संघटनेचे कंबरडे मोडण्याचे आदेश साहेबांनी सैन्याला दिले.सैन्यदलाने मग संबंधित भागात मोठी कारवाई करून उल्फा अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केला.उल्फा ने अगतिक होऊन आपली चळवळ मागे घेतली.

पवार साहेब संरक्षनमंत्री होईपर्यंत स्त्रियांना सैन्यात स्थान नव्हते.स्त्रियांच्या एकूणच क्षमतेवर त्यावेळी शंका उपस्थित केले जायची.साहेबांना मात्र स्त्रियांवर आणि त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता.परिणामी त्यांनी महिलांना सैन्यात 11% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.आणि महिलांसाठी सैन्याची दार उघडी केली.आज इतक्या मोठ्या प्रमाणात महिला सैन्यात दिसतात, त्याचा पाया हा साहेबांनी खनलेला आहे.

रशियाच्या विघटनानंतर त्याची स्थिती खराब झाली होती.तो भारताचा पारंपरिक मित्र होता.तरीदेखील पवारसाहेबांनी दूरचा विचार करून अमेरिकेशी मैत्री वाढवली.संयुक्त सैनिकी कवायती,त्यांनी अमेरिकेसोबत घडवून आणल्या.पण दुसरीकडे रशियासारख्याजुन्या मित्राला देखील साहेबांनी व्यवस्थित सांभाळले.

फक्त पावणे दोन वर्षाच्या कार्यकाळात साहेबांनी अनेक पायाभूत निर्णय संरक्षणमंत्री म्हणून घेतले.ज्यामुळे भारतीय सैन्याचा चेहरामोहरा बदलला.हा बदल घडून येण्यात साहेबांचा अभ्यास आणि दूरदृष्टी यांचा मोठा हात होता.

साहेब_माझाविठ्ठल

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*