गुड न्यूज | ‘या’ घटकाच्या निर्यातीत ५४ % वाढ; भारतीय शेतकरी, जगात भारी..!

भारतीय शेतकरी हा कष्ट करून मातीतून सोने पिकवतो. मात्र, अजूनही त्याला म्हणावा असा हमीभाव मिळत नाही. तरीही न थकता व न डगमगता शेतकरी नेटाने आपली लढाई लढून देशाच्या प्रगतीला वेग देत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहेच. आताही खाद्यान्न तेलाच्या निर्यातीत भारतीय शेतकऱ्यांनी मोठी मजल मारली आहे.

भारतातील मोठ्या लेकासंख्येला पुरून थेट तेलाची निर्यात करण्यामध्ये भारताचे नाव घेतले जात. त्याच तेलाच्या निर्यातीत मागील आर्थिक वर्षामध्ये थेट ५४ टक्के वृद्धी नोंदवली आहे. २०१८-१९ मध्ये देशातून तेलाची निर्यात ६२७ कोटी रुपयांची झाली होती. मात्र, २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये हीच निर्यात ९५५ कोटी रुपयांची झाली आहे. साल्वेंट एक्सट्रैक्टर्स एसोसिएशन (एसईए) यांनी ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

सर्वाधिक निर्यात शेंगदाणा तेलाची झाली आहे. एकूण ५२ हजार ४९० टनापैकी एकट्या शेंगदाण्याचा वाटा ३८ हजार २२५ आहे. त्यापैकी एकट्या चीनने ३३ हजार ५०५ टन शेंगदाणा टेल भारताकडून आयात केले आहे. तसेच सोयाबीन, सोयाबीन, मोहरी, राईस ब्रान, तीळ आदि तेलाची निर्यातही झालेली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*