Blog| ‘रयत’चा विद्यार्थी झाला अध्यक्ष; पवार साहेबांचा प्रेरणादायी प्रवास

राजकीय असो की सामाजिक जीवन असो. त्यामध्ये सगळ्यांना कोणी ना कोणी गुरू असतोच. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे गुरू म्हणजे आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. पवार साहेबांच्या याच कामावर आधारित खास लेखमाला मंत्री आव्हाड यांच्या फेसबुक पेजवरून सुरू झालेली आहे. आम्ही ती वाचकांसाठी जशीच्या तशी प्रसिद्ध करीत आहोत. @टीम कृषीरंग

साहेब_माझाविठ्ठल
भाग – 15

रयत शिक्षण संस्थेचा एक सामान्य विद्यार्थी ते त्याच संस्थेचा अध्यक्ष – पवार साहेबांचा प्रेरणादाई प्रवास

महाराष्ट्रातील ग्रामीण,आदिवासी आणि दुर्गम भागातील शिक्षण प्रसारसाठी प्रसिद्ध असलेल्या,”रयत शिक्षण संस्थेचे” पवारसाहेब १९८९ मध्ये अध्यक्ष झाले. विशेष म्हणजे,याच संस्थेच्या प्रवरानगर आणि बारामती येथील शाळांचे ते विद्यार्थी होते.साहेब या संस्थेचे अध्यक्ष झाल्यानंतर संस्थेच्या शाळा, महाविद्यालये आणि आश्रमशाळांमध्ये मोठी भर पडली.

आधुनिकतेशी नाळ जोडून ठेवण्यास नेहमीच कटीबद्ध असणारे पवारसाहेब विद्यार्थ्यांच्या संगणक साक्षरतेसाठी तेंव्हापासूनच आग्रही होते. आणि म्हणूनच त्याकाळी त्यांनी संस्थेसाठी१८ कोटी रुपयाचा स्वतंत्र निधी देखील उभा केला.

विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजावी आणि संशोधक जन्मावेत यासाठी त्यांनी रयत विज्ञान परिषदेची स्थापना केली. तसेच संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. सोबतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाते.भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. आज संस्थेच्या चार ठिकाणी क्रीडा अकादमी सुरू झाल्या असून ४२ महाविद्यालयापैकी १४ महाविद्यालयांना ‘नॅक चा ‘अ दर्जा मिळाला आहे….!!

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जो ज्ञानाचा वटवृक्ष मोठ्या कष्टाने उभा केला होता,त्या वटवृक्षाची पाळंमुळं त्यांच्याच शाळेत शिकलेल्या एका विद्यार्थ्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर अजून खोलवर नेली,आणि राज्यातीलच नव्हे तर देशातील एक नावाजलेली शिक्षणसंस्था म्हणून रयतच नाव पवार साहेबांनी अजूनच नावारूपाला आणलं..!

#साहेब_माझाविठ्ठल

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*