शेतकऱ्यांनो, युरियाच्या वापराचे ‘हे’ तंत्र समजून घ्या; आहे खूप फायदेशीर

युरिया खताचा बेसुमार वापर करून काहीच साध्य होत नाही. उलट यामुळे शेतमालाची प्रतवारी कमी होते. तसेच कीपिंग क्वालिटी (टिकवण क्षमता) कमी होते. परिणामी उत्पदान खर्चही वाढतो. त्यामुळे आज आपण युरियाचा अवाजवी वापर टाळण्याच्या मुद्यांवर फोकस करणार आहोत.

लेखक : डॉ. आदिनाथ ताकटेमो.९४०४०३२३८९

मृद शास्त्रज्ञएकात्मिक शेती पद्धतीमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर)

खते देण्यापूर्वी माती परिक्षण करून घ्यावे. परीक्षण अहवालानुसार खते द्यावीत. नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर योग्य प्रमाणात वापर करावा. समवेत हिरवळीच्या खतांचाही वापर करावा. नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळी फेकून न देता, दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करतानाच द्यावीत. नत्र खताची मात्रा विभागून द्यावी. एक किलो नत्र देण्यासाठी २.१७ किलो युरिया द्यावा लागतो. युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना अँझोटोबँक्टर किंवा अँसिटोबँक्टर वापरावे. तर, द्विदल पिकांना रायझोबियम या जीवाणू खतांची २५० ग्रँम प्रती १० किलो बियाणे याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. जैविक खतांच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिके व भाजीपाला पिकांमध्ये १५-२० टक्के नत्राची बचत होते व उसामध्ये ५० टक्क्यांपर्यंत बचत होते.

भातासारख्या पिकास युरिया ग्रँनुल्सचा वापर करण्याची काळजी घ्या. तर, पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करावा. कोरडवाहू शेतीमध्ये नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळेस पेरून द्यावीत. तर, उस, केळी, बीटी कापूस यासारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांना युरिया खताची मात्रा विभागुण द्यावी. नायट्रेटयुक्त खते वाहून जाऊ नयेत म्हणून नियंत्रीत आणि हलकी ओलिताची पाळी द्यावी. क्षारयुक्त व चोपणयुक्त जमिनीत युरिया खते हे शेणखत, कंपोस्टखत अथवा गांडूळ खताबरोबरच द्यावे.तसेच युरिया खताची मात्रा २५ टक्क्यांनी वाढवून द्यावी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*