सोयाबीनची ‘ही’ असेल परिस्थिती; २५ टक्के क्षेत्रावर दुबार पेर, नाहीतर बसेल मोठा फटका

यंदा महाराष्ट्रात सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. किमान २५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा दुबार पेरा करावा लागला आहे. तसेच पुढील पंधरवड्यात जर पुन झालाच नाही तर, महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

सोयाबीन प्रोसेसर्स एसोसिएशन ऑफ इंडिया (SOPA) अर्थात सोपा या संघटनेने म्हटले आहे की, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोयाबीनची पेरणी ३८ टक्के जास्त आहे. सोयाबीनच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या मध्यप्रदेश राज्यात योग्य वेळेवर पेरणी झाल्याने तेथील पिक फुलोऱ्यात येऊ लागलेले आहे. मात्र, तिथेही पावसाची गरज आहे. राजस्थानातही तीच परिस्थिती आहे.

तर, महाराष्ट्र राज्यात दुबार पेरणी करावी लागल्याने बऱ्याच भागात आता पिकाच्या दर्जावर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. तसेच लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने पावसाची गरज आहे. आठवड्यात पाऊस जर नाही झाला तर या भागातील उत्पादनात घट होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*