येत्या ४८ तासात महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी होणार पाऊस

मुंबई :

गेल्या २४ तासात मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. रविवारी रात्रीपासूनच पावसाने कोसळायला सुरुवात केली होती. मुंबईत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. आता पुढच्या 48 तासात मराठवाड्यात व अंतर्गत भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे के.एस. होसालीकर यांनी सांगितली आहे.

तसेच येत्या २४ ते ४८ तासात मुंबई, ठाणे मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता आहे. तर १ ऑगस्ट पासून कोकणात जोरदार पाऊस असण्याची शक्यता त्यांनी सांगितली आहे.

काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भाच्या काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये नुकताच चांगला पाऊस झाला आहे. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*