दूध दर आंदोलनाला धार; आक्रमक आंदोलकांनी उचलले ‘हे’ पाऊल

कोल्हापूर :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही दूध दरासाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकारने एक बैठक बोलावली परंतु सदर बैठकीत तोडगा न निघाल्याने ऑगस्टच्या १ तारखेला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आले होता. त्यानुसार आज पहाटेपासून राज्यात विविध ठिकाणी विरोधी पक्षासह काही शेतकरी संघटना आंदोलनात उतरल्या आहेत.

दुधाच्या खरेदी दर वाढवून मिळावा, त्यासाठी राज्य सरकारनं अनुदान द्यावं, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाने आता आक्रमक वळण घेतले आहे. पश्चिम महाराष्ट्रात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे. आजच्या या आंदोलनात विरोधी पक्ष भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष व रयत क्रांती संघटनासह , किसान संघर्ष समितीचे कार्यकर्ते सहभागी आहेत. कोल्हापुरात अकरा वाजता महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

अशा घडल्यात घटना :-

  • पंढरपूर येथे रासपचे आमदार महादेव जानकर यांनी चंद्रभागा नदीत विठ्ठलाला दुधाचा अभिषेक घातला.
  • मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर रयत क्रांती संघटनेचे टायर पेटवून आंदोलन

३) सांगलीत कराड ते तासगाव मार्गावरही ‘रयत’च्या कार्यकर्त्यांनी फोडला दुधाचा टँकर

४) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचं आंदोलन. तिथं गावच्या चावडीवरील दगडाला घातला दुग्धाभिषेक.

५) भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी इस्लामपूर शहरात दुधाची गाडी अडवून लोकांना दूध वाटले 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*