अलेक्झांडरची वाट अडवणारी व्यास नदी धोक्यात..!

सम्राट अलेक्झांडरची वाट अडवणारी व्यास (बियास) नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रदुषणामुळे नदीची लेकरं मृत्युमुखी पडत आहेत. नदी प्रदुषीत झाल्यानंतर काय होते,  या प्रश्‍नाचे उत्तर देणारा हा लेख…

लेखक : विशाल केदारी, कृषी पत्रकार (संपर्क : ७७१९८६००५८)
ग्रीकांचा राजा अलेक्झांडर (सिकंदर) जग जिंकण्यासाठी निघाला होता. विविध प्रदेशांवर विजय मिळवत तो भारताच्या दिशेने निघाला. भारतात त्याची वाट हिमालयातल्या व्यास नदीने अडवली होती. व्यास नदीचे  अक्राळ-विक्राळ रूप पाहून अलेक्झांडरसुद्धा हबकला होता. ‘अलेक्झांडर द ग्रेट’ला रोखणारी व्यास नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रदुषणामुळेआजारी पडलेल्या व्यास नदीची असंख्य लेकरं मृत्युमुखी पडायला लागली आहेत. मृत्युमुखी पडणार्‍या लेकरांमध्ये जलचर, पक्षी व शेतजमिनीचा समावेश आहे.

व्यास नदीचा उगम

हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास येथून व्यास नदी उगम पावते. व्यास नदी विपाशा  नावाने सुद्धा ओळखली जाते. एकूण १४,३०८ फूट उंचावरुन वाहणारी व्यास नदी ४७० किलोमीटरचा प्रवास करुन सतलज नदीला मिळते.
व्यास नदीला प्रदुषणाचा विळखा

पंजाब राज्यात गुरुदासपुर नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील किरीअफगाणा नावाचे गाव व्यास नदीच्या तिरावर वसले आहे. गावात अद्ययावत साखर कारखाना उभारण्यात आला आहे. याच कारखान्याचे रसायनयुक्त पाणी नदीत सोडण्यात येते. रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील अनेक मासे मृत्युमुखी पडत आहेत. माश्यांवर उपजिविका करणारे पक्षीही गायब झाले आहेत.तर, शेतजमिन नापिक होत आहेत.
मृत्युमुखी पडलेल्या मास्यांची जाती

रसायनयुक्त पाण्याचा विविध जलचरांवर परिणाम झाला आहे. नदीतील ट्रॉट व मसहीर नावाचे मासे मृत्युमुखी पडले आहेत.

गायब झालेले पक्षीपंजाब व हिमाचल प्रांतातील व्यास नदीच्या परिसरात मासे खाणारे घुबड आढळते. नदी प्रदुषणामुळे हे मासे खाणारे घुबड गायब झाल्याचे पक्षी निरिक्षकांनी स्पष्ट केले आहे. व्यास नदीकाठी विविध प्रकारच्या चिमण्या आढळतात. पहाडी चिमण्या महाराष्ट्रीयन चिमण्यांपेक्षा आकाराने मोठ्या असतात. सदर चिमण्यासुद्धा नदी-प्रदुषणामुळे गायब झाल्या आहेत. नदीप्रदुषणामुळे विदेशी पक्ष्यांचे स्थलांतर थांबले आहे.
शेतीवर झालेला परिणामविषारी रसायनयुक्त पाण्यामुळे किरीअफगाणा परिसरातील शेतजमिनी नापिक झाल्या आहेत. फळबागांची वाढ खुंटली आहे. जनावरांचा भाकड काळ कमी झाला आहे.
आरोग्याच्या समस्याहिमाचल व पंजाब प्रांत उत्तम आरोग्यासाठी जगप्रसिद्ध आहे. नदी प्रदुषणामुळे पंजाब प्रांतातील अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*