मोदींनी दिल्या हाती टोकऱ्या : आव्हाड

मुंबई :

नोकऱ्या देतो असे आमिष दाखवून सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वास्तवात बेरोजगार युवकांच्या हाती टोकऱ्या दिल्याची बोचरी टीका पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या अहवालानुसार देशात वाढलेल्या बेकारीच्या मुद्द्यावर आव्हाड यांनी एक विशेष कविता ट्विट केली आहे. त्यात त्यांनी मोदींनी भारतीय तरुणांच्या नशिबी बेकारी टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. अभ्यासपूर्ण व विशेष पद्धतीने आव्हाड भाजप सरकारला टीकेचे लक्ष्य करीत असतात. त्यामुळे भक्तही त्यांच्यावर विशेष लक्ष ठेऊन असतात. या कवितेला मोदी भक्त व भाजप कसा प्रतिसाद देतात, याकडे आता सर्वांचेच लक्ष राहील.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*