होय, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले; सरकारचा दावा

दिल्ली :

मागील चार वर्षांत केंद्र सरकारने राबविलेल्या योजना व धोरणामुळे देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. यापुढेही मोदी सरकार शेतकरी व ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी काम करीत राहील, असा दावा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केला.

संसदेत आज ते अर्थसंकल्पीय भाषण करीत आहेत. निवडणूक वर्ष असल्याने त्याला विशेष महत्व आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोयल यांना हा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी दिली आहे. त्यांनीही सरकार कसे शेतकरी हितासाठी काम करीत आहे, याचे दाखले देण्याचा प्रयत्न करीत आज अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*