सुटता सुटेना आघाडीचा अवमेळ

कोल्हापूर :

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच देशातील राजकीय चित्र स्पष्ट होण्याऐवजी आणखीनच अष्पष्ट होत आहे. भाजपच्या 42 मित्रपक्षांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि 20-22 मित्रपक्ष एकत्र येऊन निवडणूक लशाविण्याची तयारी करीत आहेत. तर, तिसरी आघाडी आणि महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी वेगळी चूल मांडून बसली आहे. या तिढ्यात आघाडीचा अवमेळ सुटेनासा झाला आहे.

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे जागावाटप पूर्ण होऊन उमेदवारी कधी जाहीर होणार याबद्दल उत्सुकता कायम आहे. शिवसेना व भाजप यांचेही भांडण मिटण्याची चिन्हे नाहीत. त्याचवेळी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व ठिकाणी उमेदवार देण्यासाठी तयारी ठेवली आहे. अशावेळी आघाडीचा तिढा लवकर न सुटल्यास याचा थेट लाभ भाजपला होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*